आजोबांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त नातवंडांनी शालोपयोगी भेट वस्तू देऊन साजरा केला आगळा वेगळा उपक्रम

शिहू : मंजुळा म्हात्रे

येथील शिहू विभागात नावाजलेले आयुर्वेदाचार्य बाळाराम महादू म्हात्रे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त त्यांच्या नातवंडानी प्राथमिक शाळा शिहू येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करून आपल्या अजोबांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली आहे.

यावेळी शाळेतील शिक्षकांसह प्रफुल म्हात्रे, मनोज म्हात्रे, सागर म्हात्रे, दिपक म्हात्रे, प्रशांत म्हात्रे,मनीषा पाटील, मेघा भुरे, अमृता बुरुमकर, अवंती म्हात्रे उपस्थित होते. उपस्थितांचे शाळेच्या वतीने आभार माणन्यात आले.

Popular posts from this blog