🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

नागोठणे पत्रकार संघातर्फे धाडसी कार्य करणाऱ्या पोलीसांसह रेस्क्यू टीमचा सन्मान

शिहू : मंजुळा म्हात्रे

नागोठणे पत्रकार संघातर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धाडसी व अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस बांधव व रेस्क्यू टीमचा सन्मान नागोठणे येथील दत्त मंदिरात उत्साहात संपन्न झाला.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, दि.१२ व १३ जुलै रोजी संध्याकाळी आंबा नदीने धोक्याची पातळी ओलंडली होती. पावसाचा जोर कायम असल्यामुळे नागोठणे शहरासह इतर भागात पुराचे पाणी शिरले होते. अशातच पलस गावाच्या हद्दीत काही आदिवासी तरुण उंदीर पकडायला गेले होते. पुराचा पाणी वाढल्यामुळे ते पाण्यात अडकून राहिल्याची माहिती पलस गावचे पोलीस पाटील बबन शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्याने त्याची तात्काळ दखल घेत महेश सानप यांच्या रेस्क्यू टीमच्या सहाय्याने ६ तरुणांना सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्या या धाडसी कार्याची दखल घेत नागोठणे पत्रकार संघातर्फे त्यांचे कौतुक करून सन्मानित करण्यात आले.

या वेळी नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, एक कौतुकाची थाप देण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.१२ जुलै ला नागोठण्या मध्ये मोठा अनर्थ घडता घडता वाचला आहे या साठी नागोठणे पोलीस स्टेशनचे बहाद्दर पोलिसांची धडपड व त्यांच्या मदतीला धावून आलेले रेस्क्यू चे जवान यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहेत. नागोठणे शहर हा आंबा नदी पात्रा लगद असल्यामुळे अशा घटना घडू नये या साठी रेस्क्यू च्या महेश सानप यांनी नागोठण्यातील तरुणांना प्रशिक्षण द्यावे जेणेकरून अशा परिस्थितीला ते पोलीसांना सहकार्य करतील अशी विनंती केली. या वेळी भिसे यांनी १९८९ च्या महापुरातील आठवणींना उजाळा दिला. तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी नागोठणे पत्रकार संघाचे विशेष कौतुक करून प्रेरणादायी व तरुणांचे मनोधेर्ये वाढवणारे कार्य पत्रकार संघाच्या माध्यमातून करत असल्याचे म्हटले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख किशोर जैन, नागोठणे पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पी. एस. आय नारायण चव्हाण, नागोठणे सरपंच मिलिंद धात्रक, शिवसेना उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, भाजपा मा. उपजिल्हाध्यक्ष किशोर म्हात्रे, नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे, उपाध्यक्ष किरण लाड, सचिव महेंद्र माने, सहसचिव मनोहर सकपाळ, पंचायत समिती मा. सदस्य बिलाल कुरेशी, नागोठणे काँग्रेस शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, रेस्क्यू टीमचे महेश सानप, इत्यादीनसह नागोठणे पत्रकार संघाचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण म्हात्रे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog