अकेशीया इमारती मालाची विनापरवाना वाहतूक 

१५ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल रोहा वनविभागाने केला जप्त

रोहा : समीर बामुगडे 

अकेशीया इमारती मालाची विनापरवाना वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील खांब गावाजवळ सापळा लावून वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी १५ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक रोहा श्री अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा श्री विकास रा.भामरे व स्टाफ श्री आर.जी.पाटील, वि.टी. ठाकूर वनपाल फिरते पथक रोहा, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, पोपट करांडे, वनपाल खांब राजेश गायकवाड, वनरक्षक तपासणी नाका कोलाड अंगद भोसले, मंगेश पव्हरे, वनरक्षक खांब साधू देवकांबळे, वनरक्षक धामणसई सन्मेघ भगत यांनी दिनांक 04 जुलै 2022 रोजी रात्री 01.30 वाजता मिळालेल्या गुप्त बातमी वरून रोहा तालुक्यातील खांब गावाजवळ मुंबई गोवा रस्त्यावर गस्त करीत असताना अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH/06/BW/5214 ची  तपासणी केली असता अकेशिया इमारती माल 26.98 घमी.किंमत 85,284/- रुपये व अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH/06/BW/5214 अंदाजे किंमत 15,00,000/- विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला. सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व अकेशीया इमारती माल असा 15,85,284/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी वाहन चालक मालक तौहिद अहमद रा.रोहा, जि. रायगड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Popular posts from this blog