तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत देवकान्हे येथे यंत्राच्या साह्याने शेतामध्ये भात लागवड

रोहा : समीर बामुगडे

तालुका कृषी अधिकारी रोहा कार्यालयांतर्गत मौजे देवकान्हे मध्ये श्री नथुराम भोईर यांच्या शेतावर यंत्राच्या साह्याने भात लागवड करण्यात आली. या प्रात्यक्षिकाचे नियोजन सारिका दिनेश दिघे-सावंत सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले. तालुका कृषी अधिकारी रोहा कार्यालयातील कृषी अधिकारी श्री डी बी साले, सहाय्यक कृषी अधिकारी श्री पी एस राक्षीकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्रीमती कविता दोरुगडे या उपस्थित होत्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली चे विद्यार्थी देवकान्हे धानकान्हे शेतकरी श्री अविनाश कान्हेकर, श्री पांडुरंग गोसावी, श्री धोंडू कचरे, श्री विश्वनाथ भोईर, श्री सुनील बाईत, स्वतः शेतकरी प्रसाद भोईर हे उपस्थित होते.

यंत्राद्वारे लागवड केल्याने वेळेची व खर्चाची बचत होते. त्यामुळे पुढील काळात जास्तीत जास्त यंत्राचा वापर आपल्या भागात करून सर्व शेती लागवडीखाली आणूयात असे आव्हान सौ सारिका दिघे-सावंत सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले

Popular posts from this blog