विभागातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहता कामा नये -- आ. रविशेठ पाटील
पाणी पुरवठा संदर्भात आढावा बैठकीत केली सूचना
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील भाजपाचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या पुढाकाराने विभागातील पाणीपुरवठा संदर्भात आ. रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तातडीची बैठक येथील शिवगणेश उत्सव मंडळ सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी आ.रविशेठ पाटील यांनी विभागातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहता कामा नसल्याची सूचना उपस्थित अधिकारी वर्गाला केली.
या आढावा बैठकीत पाणी पुरवठा अधिकार्यांकडून विभागात झालेल्या व होत असलेल्या पाणी योजनांची माहिती घेतली. सोपान जांभेकर यांनी पाणी टंचाई जाणवत असल्याने तातडीची बैठक घेतल्याचे सांगितले. किशोर म्हात्रे यांनी पाण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून येथील पाणी साठवण टाक्या वापर नसल्याने जीर्ण झाल्याचे सांगून दुरूस्तीमध्ये खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात नवीन बांधून होणार असल्याचे सांगितले. सचिन मोदी यांनी आक्रमकतेने पाण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून मागील दोन तीन दिवस शहरातील काही भागात पाणी पुरवठा होत नव्हता त्यावेळी सूचना किंवा दवंडी देणे महत्वाचे असून टँकरने पाणी देणे गरजेचे असल्याचे सांगितले. आनंद लाड यांनी पाणी नसलेल्या ठिकाणी टँकरने पाणी देण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली. मारुती देवरे यांनी काही ग्रामपंचायत कामांसाठी एनओसी देत नसल्याने आलेला लाखो रूपयांचा निधि परत जात असल्याचे सांगून कोणतेही राजकारण न करता विकास कामांसाठी एनओसी द्यावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा शेवटी देवरे यांनी दिला. यावेळी शहर व विभागातून आलेल्या नागरिकांनी केलेल्या तक्रारी व सूचना यांचे अधिकार्यांमार्फत निवारण केले. त्यानंतर आ. रविशेठ पाटील यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला सुचना देताना नागोठणे शहर मोठे आहे त्यामुळे पाण्याची व्यवस्थित व्यवस्था होणे गरजेचे आहे. ते कसे सोडविता येईल या कडे लक्ष द्या. घर घर मे नल या केंद्र शासनाच्या योजनेमार्फत निधि भरपूर असून गावोगावी ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न करा. ज्या ठिकाणी पाणी मिळत नाही त्या ठिकाणी टँकरने पाणी द्या, पाणी बंद असेल तेव्हा योग्य ती सुचना देऊनच कामे करा. अशा अनेक सूचना देऊन गोरगरीब जनतेला घरामध्ये पाणी पोहचवले पाहिजे. तसेच विभागातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहता कामा नये असे सांगून पाण्याबाबत नागरिकांच्या सूचना किंवा तक्रारी असल्याच मला फोन करा त्यावर मी तातडीने कारवाई करेन असा विश्वास शेवटी आ. पाटील यांनी सांगितले. या बैठकीत भाजप जि. उपाध्यक्ष मारुती देवरे,महिला जि. उपाध्यक्ष श्रेया कुंटे,तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, ता.सरचिटणीस आनंद लाड, मा.जि. उपाध्यक्ष किशोर म्हात्रे,शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अशोक अहिरे, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, शहराध्यक्ष सचिन मोदी,यांच्यासह अपर्णा सुटे, शितल नांगरे,नीलिमा राजे,सिराज पानसरे,सुभाष पाटील,राजेंद्र लवटे,संतोष लाड,मारुती शिर्के,तुकाराम राणे,परशुराम तेलंगे,तिरत पोलसानी तसेच म.जि.प्रा. पेणचे कोठेकर,रोहा पं.स.गटविकास अधिकारी शुभदा पाटील,रोहा पाणीपुरवठा अभियंता गांगुर्डे,सहा. अभियंता म्हात्रे, सहा. गटविकास अधिकारी एम.जे फडतरे,विस्ताराधिकारी एस.एन.गायकवाड, नागोठणे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर तसेच विभागातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment