🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨

माणगांव तालुका प्रेस क्लबने शेताच्या बांधावर जाऊन केला आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

रायगड जिल्हा प्रेस क्लब आयोजित माणगांव तालुका प्रेस क्लबच्या माद्यमातून दरवर्षी शेताच्या बांधावर जाऊन देण्यात येणारा आदर्श शेतकरी व प्रगत शील शेतकरी हा पुरस्कार २०२२ या वर्षी इंदापुर विभागातील भुवन या ग्रामपंचायतीमधील विठ्ठल नगर या गावातील प्रगतशील शेतकरी चिंतामणी रावजी यादव, तसेच निवी मुठवळी ग्रामपंचायती मधील उमरोली दिवाळी या गावातील प्रगतशील शेतकरी भोलीनाथ बाबू साळवी यांना रविवार दि. १७ जुलै रोजी उपस्थित मान्यवर रायगड जिल्ह्यातील नामवंत उद्योजक तसेच लोक शक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व माणगांव तालुका प्रेस क्लबचे कायदेशीर सल्लागार डॉ. संजय सोनावणे तसेच भुवन ग्रामपचायतीच्या सरपंच दिशा जाधव, रायगड प्रेस क्लबचे सहसचिव पदमाकर उभारे, माणगांव तालुका प्रेस क्लब अध्यक्ष संतोष सुतार, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष आरती म्हामुणकर, खजिनदार सचिन वनारसे, सचिव हरेश मोरे, विनोद सापले, पुनम धूमाळ, माणगांव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते लोकशाहीर लोककवी गोंविद शिंदे, पाणसईचे माजी सरपंच विलास शिंदे, अकुश उडरे, माजी उपसरपंच नितिन शिर्के, सदस्य भास्कर यादव, राम येलकर तसेच विठ्ठल नगरचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच इंदापुर विभागातील उमरोली दिवाळी या गावचे प्रगतशील शेतकरी भोलीनाथ साळवी यांना देखील पुरस्कार देताना युवा क्रांती संघ डेव्हलपमेंट सेंटरचे अध्यक्ष संदेश सोनावणे, संकल्पना संस्थापक सुनील कदम, नितिन साळवी यावेळी उपस्थित होते. तसेच विठ्ठल नगर येथील रायगड भुषण पुरस्कार प्राप्त गोंविद शिंदे यानी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी चिंतामणी यादव यांना मिळालेला आदर्श पुरस्कार तो त्यांना मिळालेला नसून तो समस्त विठ्ठल नगर ग्रामस्थाना मिळाला असे मला वाटत असून रायगड प्रेस क्लब तसेच माणगांव तालुका प्रेस क्लबच्या उपक्रमाबाबत आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानत आहोत.

Comments

Popular posts from this blog