🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

रोहा वनविभागाची धडक कामगिरी

बोलेरो गाडीसह १ हजार किलो लाकडी कोळसा जप्त!

रोहा : समीर बामुगडे 

अवैध वृक्षतोड करून तयार केलेल्या लाकडी कोळशाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच रोहा वनविभागाने तातडीने घटना स्थळावर जाऊन १ हजार किलो लाकडी कोळशासह बोलेरो पिकअप गाडी जप्त करून गुन्हा नोंदविला आहे.

उपवनसंरक्षक रोहा श्री अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा श्री विकास रा.भामरे व स्टाफ श्री आर.जी.पाटील, वि.टी.ठाकूर वनपाल फिरते पथक रोहा,वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम,पोपट करांडे यांनी दिनांक 14/06/2022 रोजी रात्री 21.20 वाजता मिळालेल्या गुप्त बातमी वरून महाड तालुक्यातील राजेवाडी शिरगाव रस्त्यावर गस्त करीत असताना बोलेरो पीकअप क्रमांक MH/06/BW/0355 ची  तपासणी केली असता अवैध वृक्षतोड करून तयार केलेले लाकडी कोळसा पोती 50 वजन 1000किलो किंमत 17000/- रुपये व बोलेरो पीकअप अंदाजे किंमत 5,00,000/- विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला. सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व कोळसा पोती असा एकूण एकंदर 5,17,000/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी वाहन चालक मालक राहुल तुळशीराम कंक रा.तळीये तालुका. महाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog