🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨

माणगांव-निजामपूर मार्गावर बेकायदा जुगार क्लब! 

पोलीसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी

रायगड : समीर बामुगडे

माणगांव शहरात निजामपूर मार्गावरील एका गॅरेज च्या वर बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हा अवैध जुगार क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. 

माणगांव शहरातील निजामपूर मार्गावर एका गॅरेज च्या वर बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. अनेक तरूण व वयोवृद्ध माणसे त्यांचा महिन्याचा पगार या जुगारामध्येच खर्च करीत असून अनेकांच्या कुटूंबात वाद-भांडणे सुरू असल्याचे दिसत आहे. या जुगारामध्ये एक वेळा योगायोगाने जिंकलेली व्यक्ती पुन्हा-पुन्हा जिंकण्याच्या आशेने आपली मेहनतीची कमाई वारंवार यामध्येच घालवित असल्याचे दिसत आहे. परिणामी या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था कायम टिकविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सदरचा बेकायदा जुगार क्लब तातडीने बंद करण्याची करवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog