सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग व एम. जी. एम. हॉस्पिटल मुंबई व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत तपासणी शिबीर

प्रतिनिधी : चंद्रशेखर सावंत

मोफत दंत रोग तपासणी व रक्त तपासणी शिबीर सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग, कलेक्टर ऑफिस समोर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात 120 हुन अधिक लाभार्थ्यांनी दातांची तपासणी करून घेतली शिबिराचा लाभ घेतला. सुरभी स्वयंसेवी संस्था संस्थापक जेधे व अध्यक्षा सुप्रिया जेधे विविध सामाजिक कार्यक्रम करत असतात.यावेळी एम जी एम हॉस्पिटल मुंबई सोबत दंत तपासणी घेऊन पुढील उपचार मुंबईत पूर्ण मोफत करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, जिल्हा टीबी अधिकारी रायगड डॉ. सुरेश देवकर, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक किर्तिकांत पाटील, एम.जी.एम. इन्चार्ज डॉ. पंकज लोंढे, एम.जी.एम. कोऑर्डीनेटर किरण ठाकूर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुजाता तुळपुळे, डेंटिस्ट डॉ. अक्षय कोळी, डॉ. नीरज कोळी, डॉ.वैभव, लॅब चे रोहन रत्नाकर, सुरभी स्वयंसेवी सचिव सौ. शुभांगी रणसिंग उपस्थित होते.   

सौ. सुप्रिया जेधे व  डॉ. हुलवान  यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार  मानले. कार्यक्रमास माणुसकी प्रतिष्ठान अलिबागचे अध्यक्ष ॲड. भुषण जंजीरकर कार्याध्यक्ष तानाजी आगलावे व टीम  उपस्थित होते.

Popular posts from this blog