मोर्बा जिल्हा परिषद मतदार संघात कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचे आस्वाद पाटील यांच्या हस्ते उदघाटन

माणगांव : प्रमोद जाधव

शेकाप ज्येष्ठ नेते जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद सदस्या आरती मोरे यांच्या प्रयत्नातुन व माणगांव तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या पाठ पुराव्यानी मंजूर झालेल्या माणगांव तालुक्यातील महत्वाचा समजल्या जाणाऱ्या मोर्बा जिल्हापरिषद मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांच्या विकास-कामांचे भूमिपूजन, उदघाटन व लोकार्पण १४ मे रोजी जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या हस्ते पार पडले. 

या कामांमध्ये मोर्बा ग्रामपंचायत हद्दीतील नाईटणे येथील नळपाणी योजनेचे भूमिपूजन, मौजे कुमशेत येथील विविध विकास कामांची उदघाटने, फळसप येथील रस्ता डांबरीकरण व सभागृहाचे उद्घाटन,रानवडी येथील नळपाणी योजना,सभामंडप लादी,शाळा दुरुस्ती,अंतर्गत रस्ता व  बोअरवेल चे उद्घाटन,गोवले मानसई वाडी येथील रस्त्याचे व शाळा दुरुस्ती उद्घाटन,कातळाची नळेफोडी येथे गणेश मंदिर,अंगणवाडी,साकव या कामांचे भूमीपूजन,निवाची नळेफोडी येथे रस्ता डांबरीकरण ,सभामंडप तसेच शाळा दुरुस्ती,डोंगरोली गावाला जोडणारा मुख्य रस्ता काँक्रीटीकरण, चांदोरे कुणबी आळी सामाजिक सभागृह व लोणेरे गोरेगाव विभागातील न्हावे गावातील बगाडाचे लोकार्पण,या विकासकामाचा समावेश होता.

यावेळी आस्वाद पाटील यांच्या समवेत माणगाव तालुका शेकाप ज्येष्ठ नेते रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अस्लमभाई राऊत, माणगांव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पंदेरे, अशोक गायकवाड, डोंगरोली माजी सरपंच संजय गायकवाड, मोर्बा माजी सरपंच विलास गोठल, अमोल मोहिते, तालुका कार्यालयिन चिटणीस राजेश कासारे, विलास मोरे, समीर लहाने, समीर सकपाळ, चांदोरे ग्रुप कुणबी समाज अध्यक्ष दत्ताराम पाते, कल्पेश मोरे, योगेश मोरे, चांदोरे उपसरपंच सूर्यकांत आंबेकर, राकेश तुपट, नथुराम चाचले, महेश भुवड व तालुक्यातील शेकाप चे पदाधिकारी व ज्या गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या गावातील स्थानिक ग्रामस्थ व मुंबईकर मंडळांचे सदस्य उपस्थित होते. 

आपले मनोगत व्यक्त करताना आस्वाद पाटील म्हणाले की,मी राजकारण समाजकारण यांची टक्केवारी नाही.किंवा गुणोत्तरे  काढत नाही.मी समाजकारणी नाही राजकारणी आहे.! तुम्ही कामे मागा मी काम करतो ज्या अर्थी मी तुमची कामे करणार त्या बदल्यात मी निवडणूक आल्या नंतर हक्काने तुमच्याकडे मतं मागणार! आणि देण्याची जबाबदारी देखील तुमची आहे असे प्रतिपादन जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी केले.

त्याचप्रमाणे माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आमचा पक्ष शेतकरी कामगार पक्ष हा छोटा पक्ष आहे,पण शेतकरी कामगार पक्षाची नाळ ही विकासकामाशी जोडली गेली आहे आणि मुख्यतः ग्रामीण विकासाशी जोडली गेली आहे.त्यामुळे आम्ही केवळ नारळ फोडण्याचे काम करत नाही, तर प्रत्यक्षात कामे करतो व नंतर मतदारांकडे  बहुमूल्य असा मतं रुपी आशिर्वाद मागत असतो.पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच माणगाव तालुक्यावर विकासरूपी प्रेम ठेवलेले आहे आणि हीच पक्षाची विचारधारा कायम जपण्याचा मी एक पक्षाचा म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. या कार्यक्रमांमध्ये बहुसंख्य ग्रामस्थांनी व मुंबईकर मंडळांनी रमेश मोरे यांच्या कार्यप्रणालीचा गौरव केला व स्तुतीसुमने उधळली.

Comments

Popular posts from this blog