🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

लोन देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या टोळीचा रायगड जिल्ह्यात धुमाकूळ! 

१५ दिवसांत कर्ज देण्याचे आमीष, पण ६ महिने कर्जाचा पत्ताच नाही

या टोळीपासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे

माणगांव : प्रमोद जाधव

लोन (कर्ज) देतो असे सांगून रायगड जिल्ह्यात फसवणूक करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातलेला असून भरमसाठ रक्कमेचे कर्ज जलद गतीने देण्याचे आमीष दाखवून सर्वसामान्य नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातलेला असून या टोळीकडून अनेकांची फसवणूक होण्याचे प्रकार सर्वत्र घडताना दिसत आहेत.

अनेक बेरोजगारांना, तसेच गरजवंतांना व्यवसायासाठी मोठ्या रक्कमेच्या कर्जाची आवश्यकता असते. त्यांपैकी अनेकजण नामांकीत बँकांकडे कर्जाची मागणी करतात. तर काहीजण झटपट कर्ज मिळविण्यासाठी धडपडत असतात आणि शॉर्टकट मार्गाने जाऊन स्वतःची फसवणूक करून घेत असतात. अशाच प्रकारे मोठ्या रक्कमेचे कर्ज मिळविण्यास इच्छुक असणाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी काही "लुटारू" टपून बसलेले असतात. कर्जाची गरज असलेल्या एखाद्या गरजू माणसाला शोधण्यात हे "लुटारू" चांगलेच पटाईत असतात. 

ज्यांना कर्जाची गरज आहे अशा माणसांना लुबाडणाऱ्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातलेला असून प्रथम प्रोसेसिंग फी च्या नावाखाली ३० ते ५० हजारांची रक्कम घेतली जाते. पण अनेक महिने होऊन देखील कर्जाचा थांगपत्ता नसतो! अर्थात, येथे फसवणूक झालेली असते. म्हणून अशा प्रकारे कर्ज मिळवून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्यांना कुणीही पैसे देऊ नयेत व त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog