🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

रोहा तालुक्यात रॉयल्टीचा घपला, माती चोरीमुळे बुडतोय शासनाचा महसूल!

रोहा : प्रतिनिधी 

रोहा तालुक्यात माती चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. वीटभट्टीसाठी, इमारतीच्या भरावासाठी तसेच अन्य कारणासाठी मोठ्या प्रमाणात माती चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांच्या महसूलावर पाणी फेरावे लागत आहे.

रोहा तालुक्यात वीटभट्टीचा व्यवसाय सुरू असन त्यासाठी मोठ्या प्रमाणात माती चोरी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रॉयल्टी बुडवून आणि शासनाची फसवणूक करून मातीची वाहतूक केली जात आहे. बेकायदेशीरपणे माती उत्खनन चालू असताना देखील तलाठी, मंडळ अधिकारी यावर कारवाई का करत नाहीत असा सवाल स्थानिक विचारत आहेत.

वन विभाग आणि शासकीय जागेतून शासनाची रॉयल्टी बुडवून मातीची चोरी डंपर ट्रक या गाड्यांचा वापर करून केली जात आहे. पोलीस, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या डोळयादेखत मातीचे डंपर जात असताना देखील त्यांवर कारवाई केली जात नाही, याउलट माती चोरांना प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याचे बोलले जात आहे.

दिवसाढवळ्या रोहा परिसरातुन मातीचे ट्रक, डंपर भरुन शेकडो ब्रास माती वाहुन नेली जात आहे. मात्र शासनाचा महसूल बुडत असताना देखील कारवाई केली जात नाही. ठिकठिकाणी मातीची चोरी होत असून मातीसाठी खड्डे खणले जात आहेत, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. रोहा तालुक्यात रस्ते ईमारतींची कामे व वीटभट्टीच्या कामांना वेग आला आहे. १०० ब्रास मातीची रॉयल्टी भरून ५०० ब्रास पेक्षा अधिक माती नेऊन शासनाची फसवणूक केली जात आहे. याकडे तलाठी, मंडळ अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी भरावासाठी लागणारी माती नेली जात आहे. माती काढून ती बांधकाम व्यावसायिकांना भरावासाठी विकली जात आहे. चढ्या दराने मातीची विक्री करून काळा पैसा कमविला जात आहे. या सर्व उत्खननामुळे नैसर्गिक संपत्ती नष्ट होत चालली आहे.

Comments

Popular posts from this blog