🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

अनेक संकट वादळातही ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री -- खासदार राजन विचारे

शिवसंपर्क अभियान टप्पा 2 - बेणसे येथे केले प्रतिपादन

नागोठणे : महेंद्र माने 

दि. 25 मे 2022 शिवसंपर्क अभियान रायगड मधून दूसरा टप्पा सुरू झाला असून त्या अनुषंगाने मंगळवार 24 मे रोजी येथील विभागातील पेण तालुक्यातील बेणसे येथील ग्रामपंचायत नवीन इमारत उद्घाटन प्रसंगी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून अनेक कृत्रिम व नैसर्गिक संकटासह वादळे आली. त्या वादळातही ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचे प्रतिपादन खा.राजन विचारे यांनी केले. या वेळी आ.महेंद्र दळवी, मुंबई महानगर पालिकेच्या माजी महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर,शिवसेना उपनेत्या मीना कांबळी, आ.विशाखा राऊत, संपर्क प्रमुख विलास चावरी, सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, मा.जि.प.सदस्य किशोर जैन, मा.जिल्हाप्रमुख विष्णु पाटील यांच्यासह अविनाश म्हात्रे, तुषार मानकवळे, नरेश गावंड, बेणसे सरपंच मधुकर पारधी, उपसरपंच सपना पांढरे, माजी सरपंच प्रीती कुथे, माजी उपसरपंच उध्दव कुथे, सायली सदावर्ते, दिपश्री पोटफोडे, दर्शना जवके, कल्पना पाटील, साधुराम मालुसरे, रिलायन्सचे रमेश धनावडे व अजिंक्य पाटील तसेच बेणसे ग्राम पंचायत सर्व सदस्य-सदस्या,ग्रामस्थ व विभागातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा.विचारे यांनी सांगितले की, आज या बेणसे येथील अतिशय सुसज्ज अश्या ग्रामपंचायतच्या इमारतीचे काम रिलायन्सच्या सीएसआर फंडातून झाले आहे. तो फंड दिल्याबद्दल उपस्थित रिलायन्स अधिकार्‍याचे आभार मानून जर आपण येथील स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकर्‍या दिल्यात तर तुमच्या यापेक्षाही खास सत्कार करू असे सांगितले. तसेच महाराष्ट्राचे भूषण व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोना सारखे महाभयंकर संकट आले त्यामधून सहीसलामात महाराष्ट्र बाहेर पडला त्यानंतर अनेक नेसर्गिक व कृत्रिम संकटे व वादळे आली त्यासमोरही ठामपणे उभे राहणारे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून आई जगदंबा त्यांना अधिक बळ देवो; अशी प्रार्थना खा.विचारे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियान दुसर्‍या टप्प्याची सुरुवात रायगड मधून होत असून, शिवसैनिकांनी मेहनत घ्या व आपण अडीच वर्षात केलेली सर्व विकास कामे,योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा. जेणे करून त्याचा फायदा निवडणुकी आपल्याला होईल. येथील बेणसे-कोलेटी पूल प्रश्न असेल कींवा इतर विकास कामे असतील ती आम्ही ठामपणे पूर्ण करू असा विश्वास शेवटी खा.विचारे यांनी दिला. आ. महेंद्र दळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारात मी आमदार होण्याचे भाग्य मला मिळाल्याचा अभिमान असून सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री निर्णय घेतात.येथील पाणी प्रश्न सोडविणार असून बेणसे-कोलेटी पूलही प्रयत्नशील आहे.आपल्या सरकारची विकास कामे शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा व आपल्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा असे सांगून आपण केलेल्या कामांच्या जोरावर यावेळी शिवतीर्थावर भगवा निश्चितच फडकणारच असल्याचे शेवटी आ.दळवी यांनी सांगितले. किशोरी पेडणेकर यांनी कोविडने गाव,वाड्या,शहर,देश थांबवला पण आपल्या राज्याचे कुठलेली काम थांबले नाही कारण आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना बरोबर घेऊन चालतात. ते सुसंस्कृत, सयमी, शांत असून त्यांनी कामांचा कस लावला व देशामध्ये अव्वल नामांकन मिळविणारे ते शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. आपल्या पूलाचा प्रश्न खा. विचारे,आ.दळवी पुढे नेहतीलच पण हा आपला सेनेचा साकाव ना. आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही मंडळी पूर्ण केल्या शिवाय स्वस्थ बसणार नसाल्याचेसांगून ही ग्रामपंचायत व गाव सुंदर आहे ते टिकविण्याचे काम आपल्याला करायचे असून जेणे करून हा विभाग आपला राहील असे शेवटी पेडणेकर यांनी सांगितले. आपल्या प्रस्तावनेत उद्धव कुथे यांनी या सुसज्ज इमारतीसाठी रिलायन्सने फंड दिला तसेच कंपनीने कोविड काळातही चांगली मदत केल्याबद्दल अधिकार्‍यांचे आभार मानतो. तसेच या विभागातील पाच ग्रामपंचायती पेण तालुक्यात येतात. साधारण एकोणीस हजार लोकवस्ती असलेल्या लोकांना सरकारी कामे,तहसील,कोर्ट,दवाखाना यासाठी वारंवार पेणला जावे लागते; त्यासाठी आम्हाला नागोठणे किंवा पोयनाड मार्गे जावे लागल्यामुळे वेळ व इंधनही जास्त लागते. येथून समोरच राष्ट्रीय महामार्गावरील कोलेटी हे गाव फक्त दीड किलोमीटर आहे. त्यासाठी खाडीवर बेणसे ते कोलेटी पूल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी सेनेच्या उपनेत्या मीनाताई कांबळी यांनी मदत केली असून पूल झाला तर वेळ व इंधन निश्चितच वाचणार तसेच हजारो रुपयांची बचतही होणार असून त्यासाठी तेथे उपस्थित नेत्यांच्या प्रयत्न करण्याची विनंती करून जर आपल्या प्रयत्नाने हा पूल झाला तर येथील जनता शिवसेनेला कधीही विसरणार नसल्याचे शेवटी कुथे यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार उद्धव कुथे यांनी मानले. शेवटी राष्ट्र गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog