कराटे प्रशिक्षक कु. समिक्षा दिपक कायंदेकर हिचा 2022 मध्ये एकूण तीन पुरस्कारांनी गौरव
मुंबई : प्रतिनिधी
कराटे प्रशिक्षक कु. समिक्षा दिपक कायंदेकर हिला 2022 रोजी एकूण तीन पुरस्काराने गौरविण्यात आले. पहिला पुरस्कार दि. 02 जानेवारी 2022 रोजी भांडुप येथे कराटे या खेळासाठी महाराष्ट्र खेल पुरस्कार कु. समिक्षा हिला शिक्षण तथा अधिकारी राजेश कंकाळ, बॉडी बिल्डर मिस्टर इंडिया मनिष अडविलकर, विशाल जाधव, राजू मोरे आणि राजकुमार बागडी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील मुलांना (न्यूयॉर्क, युके, यु.एस,ए, दुबई) येथील मुलांना ऑनलाईन कराटे, किक बॉक्सिंग आणि सेल्फ डिफेन्स ती घरातूनच शिकवते. यासाठी तिला दुसरा पुरस्कार उत्तराखंड हरिद्वार येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी इंटरनॅशनल कोच म्हणून समिक्षाला द्रोण रत्न स्पोर्ट्स अवॉर्ड-2022 श्री विनोदकुमार वर्मा, श्री राजू मोरे यांच्या हस्ते देण्यात आला आणि तिसरा पुरस्कार दादर येथे 08 मार्च 2022 जागतिक महिला दिनानिमित्त समिक्षाला राज्यस्तरीय भारतज्योती क्रीडा रत्न नारी गौरव पुरस्कार 2022 सुप्रसिद्ध कवी श्री अशोक नायगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे सर्व पुरस्कार समिक्षाचे गुरू डॉ. मंदार पनवेलकर यांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शनामुळे तिला मिळाले आणि तिच्या स्वतः च्या मेहनतीचे फळ तिला या सर्व पुरस्कारांनी मिळाले. अजून पण ती पर्सनल कोच म्हणून मुंबईमध्ये घरी जाऊन महिला आणि मुलींना कराटे आणि सेल्फ डिफेन्स शिकवते.

Comments
Post a Comment