🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

रा. जि. प. गोवे शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा

कोलाड : निलेश महाडिक

गोवे येथील रा. जि. प. शाळेत  शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपसरपंच श्री. नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्या सौ. रंजिता  जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. पांडुरंग जाधव, उपाध्यक्ष श्री. प्रदीप पवार, अंगणवाडी सेविका सौ. सुजाता जाधव, मदतनीस सौ. अल्का जाधव गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते. 

या कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरी काढून लेझीम, ढोल आणि ताशांच्या गजरात काढण्यात आली. या प्रभातफेरीमध्ये सर्व दाखल पात्र विद्यार्थी, इयत्ता पहिली ते चौथी चे सर्व विद्यार्थी तसेच माता -पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

शाळेचे मुख्याध्यापक श्री. जयेश महाडिक सहशिक्षिका श्रीम. रंजना गांधारे मॅडम  यांनी शाळेमध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक प्रदर्शनाचे स्टाॅल उभारून विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक आणि भाषिक ज्ञान मिळावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी गावातील सर्व तरूण युवक-युवतींनी स्वयंसेवक बनून सहकार्य केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महाडिक सर  तर प्रास्ताविक आणि या कार्यक्रमाची रूपरेषा सहशिक्षिका रंजना गांधारे मॅडम यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. महाडिक सरांनी मानले.

Comments

Popular posts from this blog