🚨 रायगड पोलीस शिपाई भरती : १५ मार्चला अलिबागमध्ये लेखी परीक्षा... 🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨

काजू वाडी बंधाऱ्याच्या कॉंक्रीटचे काम निकृष्ट दर्जाचे

नदीतले दगडगोटे टाकून बांधला कॉंक्रीट बंधारा

वनसंरक्षक अधिकाऱ्यांचे ठेकेदाराशी साटेलोटे!

रोहा : किरण मोरे

रोहा वनविभागात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे अधिकारी कारवाईच्या रडारवर आलेले आहेत. त्यामुळे या कामाच्या थर्ड पार्टी ऑडीट ची मागणी जोर धरू लागली आहे.

रोहा वन विभागांतर्गत रोहा तालुक्यातील काजू वाडी येथे वन बंधारा बांधकाम करणे हे काम सुरू आहे. अलिबागच्या अक्षय टोपले या एजेंसीला काम करण्याचा ठेका दिलेला आहे. या कामात बंधाऱ्याच्या कॉंक्रीट मध्ये नदीतील मोठमोठे दगडाचे गोलटे टाकण्यात आले आहेत आणि ते झाकण्यासाठी वरुन सिमेंट चा मुलामा दिलेला आहे. वापरण्यात आलेल्या कॉंक्रीटचा दर्जा अतिशय सुमार आहे.

या कामांवर देखरेख करण्यासाठी वनविभागाकडे स्थापत्य अभियंता नाही. त्यामुळे या कामाची रोजची प्रगती रेकॉर्ड केली जात नाही. झालेल्या कामाचे एकाच दिवशी बील खतवले जाते. जमीनीतील झालेल्या कामाची रेकॉर्ड एंट्री नसताना अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने बील खतवतात. दरवर्षी अशी कित्येक कोटी रुपयांची बांधकामे वनसंरक्षक रोहा विभागाकडून काढली जातात. निव्वळ भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने मंजूर केलेली बांधकामे करण्यासाठी वनविभागाकडे एक "पॉवर"फुल ठेकेदार आहे. तो वेगवेगळ्या रजिस्टर ठेकेदारांच्या नावाने ठेका घेतो.

रोहा वनविभागाअंतर्गत काजूवाडी येथील वनबंधारा बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. सदर भ्रष्ट कामाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी "बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी" या रायगड जिल्ह्यातील विश्वसनीय संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडीट करून घ्यावे आणि सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय ठेकेदाराचे पैसे अदा करण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

या भ्रष्ट कामातील सर्व दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशी तक्रार मुख्य वनसंरक्षक ठाणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog