"न्यूज २४ तास मराठी" च्या नावाचा वापर करून कुणीही दमदाटी अथवा पैशाची मागणी केल्यास थेट पोलीसांकडे तक्रार दाखल करावी! - मुख्य संपादक किशोर केणी यांचे आवाहन 

"बोगस पत्रकार" संजय पांडुरंग कदम या भामट्यापासून सावधान, तुमची फसवणूक होऊ शकते!

रायगड : प्रतिनिधी 

निर्भीड व रोखठोक बातम्यांमुळे "न्यूज २४ तास मराठी" वेब न्यूज ने सर्वत्र लोकप्रियता गाठलेली आहे. पण असे असतानाच काही ठिकाणी "न्यूज २४ तास मराठी" च्या नावाचा गैरवापर होत असल्याचे न्यूज २४ तास च्या "इन्व्हेस्टिगेशन टीम" ला आढळून आलेले आहे.

संजय पाडुरंग कदम नावाचा बोगस पत्रकार दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातून अनेकांना लाखो रूपयांना लुबाडून फरार झालेला असून रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्यात या बोगस पत्रकाराविरूद्ध अनेक फसवणूकीच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगांवमध्ये संजय कदम याने "पोलीस टाईम्स" च्या नावाने कार्यालय सुरू केले होते व अनेकांकडून दोन ते पाच हजार रूपये घेऊन त्यांना "पोलीस टाईम्स" या नावने बोगस प्रेस आयडी कार्ड दिले होते. त्यावेळी हे नवीन बोगस पत्रकार गळ्यात आयडी कार्ड टाकून अनेक ठिकाणी मोठ्या ऐटीत फिरताना दिसत होते व स्वतः मोठे पत्रकार असल्याच दिखावा करीत होते. दरम्यान, संजय कदम याने अनेक लोकांना भूलथापा मारून, नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून व पत्रकार असल्याची बतावणी करून काही लोकांकडून ५० हजार, तर काही लोकांकडून १ ते २ लाख रूपये असे लुबाडून माणगांव तालुक्यातून पनवेल येथे पळ काढला. त्यानंतर नवीन पनवेल मधील सेक्टर 15-A येथील आशिर्वाद सोसायटीमध्ये त्याने स्वतःचे ऑफीस (भाड्याने) सुरू केले. काही महिने तेथे राहून संजय कदम याने तेथील जागेच्या (ऑफीसच्या) मालकाला पण चांगलीच टोपी लावली व तेथूनही आर्थिक लुबाडणूक करून त्याने पळ काढला. 

त्यानंतर बोगस पत्रकार संजय कदम याने पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी, पुणे-सोलापूर रोड येथे स्वततःचे बोगस ऑफीस थाटले! रायगड जिल्ह्यात त्याने ऑफीस सुरू करताना "पोलीस टाईम्स" या नावाचा वापर केला होता व पुणे येथे ऑफीस सुरू करताना "न्यूज २४ तास मराठी" च्या नावाचा वापर केल्याचे उघडकीस आलेले आहे. दरम्यान, स्वतःच तयार केलेले बोगस ओळखपत्र दाखवून जिल्ह्यातील मोठा पत्रकार असल्याचे भासवून संजय पांडुरंग कदम या बोगस पत्रकाराने अनेक लोकांना भूलथापा मारून, आमीष दाखवून त्यांची आर्थिक लुबाडणूक केल्याचे उघडकीस आलेले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या नावाने व चॅनल्स च्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या या बोगस पत्रकारापासून नागरिकांनी सावध रहावे व दमदाटी अथवा पैशाची मागणी केल्यास थेट नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन "न्यूज २४ तास मराठी" वेब न्यूज चे मुख्य संपादक किशोर केणी यांनी केले आहे. 

महाराष्ट्रात विविध ठिकाणी "न्यूज २४ तास मराठी" चे पत्रकार कार्यरत आहेत, परंतु काही बोगस पत्रकार देखील "न्यूज २४ तास मराठी" चे आयडी कार्ड (बोगस कलर प्रिंट) तयार करून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आलेले आहे. 

अशाच प्रकारे "न्यूज २४ तास मराठी" च्या नावाचा वापर करताना कुणीही पत्रकार आढळून आल्यास त्या पत्रकाराचे नाव व वर्णन... ई-मेल : news24taasmarathi@gmail.com या ऑफीशियल मेल वर मेसेज करून खात्री करून घ्यावी. त्यानंतर एका मिनीटातच तुम्हाला त्या पत्रकाराच्या सत्यतेविषयी माहिती मिळेल!

"न्यूज २४ तास मराठी" च्या पत्रकारांना ओळखपत्र हे केवळ बातम्या/वृत्तसंकलन व फोटोग्राफी यांसाठीच दिलेली आहेत. त्यामुळे पत्रकाराला एखादा चुकीचा प्रकार दिसून आल्यास त्याने त्यासंदर्भात संपादकांकडे बातमी लिहून पाठविणे क्रमप्राप्त आहे. जर समोरचा माणूस माहिती देत नसेल तरीही त्यासंदर्भात संपादकांना सूचित करणे आवश्यक आहे. पण माहिती काढण्याच्या नावाखाली पत्रकार दमदाटी करून उद्धटपणा करीत असेल किंवा पैशाची मागणी करीत असेल तर अशा पत्रकारांविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे! 

- किशोर केणी, मुख्य संपादक

Popular posts from this blog