हमरापूर येथे जागतिक महिला दिन साजरा
रायगड : शेखर सावंत
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हमरापूर येथे महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन समृद्धी ग्रामसंघ हमरापूर यांच्या वतीने करण्यात आला.
हमरापूर मधील बचत गटाच्या मार्फत ग्रामसंघ तयार करण्यात आला आहे. ग्रामसंघाच्या वतीने हमरापूर मध्ये 8 मार्च चे औचित्य साधून नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ओवी, गाण्यामधून महिला दिनाचे महत्व सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी पाहुण्या म्हणून लाभलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोत्ती अभियानाच्या प्रभाग समन्वयक प्रीती पाटील तसेच ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका सौ. ज्योती कोंडवळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिला दिनाचे महत्व सांगून विविध शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसंघाच्या अध्यक्ष रेश्मा जाधव, कोषाध्यक्ष निर्मला तेजम व सचिव प्राची घरत यांनी विशेष मेहनत घेतली.