सुशांत प्रशांत स्मृती चषक गोफण स्पर्धेत तांबडी खुर्द संघ अंतिम विजेता
चणेरा/रोहा : रोहित कडू
रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने सुशांत प्रशांत स्मृती चषक आयोजित क्रिकेट सामन्यात तांबडी खुर्द संघ अंतिम विजेता ठरला. S.P. Xl गोफण व तांबडी खुर्द यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अखेर तांबडी खुर्द संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला व S.P. Xl गोफण संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच सामनावीर तांबडी संघाचा रोहित तर स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज गोफण संघाचा प्रणय महतो व उत्कृष्ट फलंदाज म्हणून तांबडी संघाचा साहिल यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
सुशांत प्रशांत गोफण यांच्या वतीने दिनांक ६ मार्च रोजी क्रिकेट चे सामने आयोजित केले प्रागणात भव्यदिव्य असे क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ. प्राजक्ता प्रभाकर कडू ग्रामपंचायत सदस्या सौ. कल्याणी कृष्णा मढवी व सौ. राजेश्री राजन पाटील तसेच इंडियन आर्मी मध्ये असलेले कु. हर्षद नरेंद्र भोई, श्री. महेश कडू, श्री. राकेश सगम, रमेश जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यंग स्टार गोफण व ग्रामस्थ मंडल गोफण यांचा उत्सफूर्तपणे प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण ग्रामस्थ मंडळाचे सदस्य श्री. मारुती वाघमारे, श्री. श्रीकांत कडू, श्री. विकास भोई, श्री. महेश कडू, कु. हर्षद भोई, सुजित भोई, श्री. राजू बामुगडे तसेच सुशांत प्रशांत Xl गोफण यांच्या हस्ते झाले.
Comments
Post a Comment