रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचे चक्रव्यूह, पोलीसांचे दुर्लक्ष! 

ऑनलाईन चक्री जुगार कायमस्वरूपी बंद करावा : नागरिकांची मागणी

रोहा : किरण मोरे

रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचे चक्रव्यूह पसरलेले असून असून अनेक जुगारवेडे तरूण या चक्रव्यूहात गुरफटत चालले आहेत. येथील बेकायदा चक्री जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करून हे ऑनलाईन चक्री जुगाराचे धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. या चक्री जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. रोहा शहरातील धावीर मार्केट, रायकर पार्क, खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला आणि नवरत्न हॉटेलच्या परिसरात असे एकूण ४ ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली आहे.

त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तातडीने सदरच्या ऑनलाईन चक्री जुगारावर कारवाईचे आदेश देऊन हा अवैध चक्री जुगार बंद करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.

Popular posts from this blog