रोह्यातील संजय गायकवाड यांना जय महाराष्ट्र पत्रकार,वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाचा महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते प्रदान

रोहा : समीर बामुगडे 

रोह्यातील पत्रकार व शिक्षक श्री संजय गायकवाड रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, महाराष्ट्र पत्रकार संघ, सत्याचा शिलेदार या वेब न्युज चे रोहा प्रतिनिधी यांना मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ या महाराष्ट्रातील पत्रकारितेमधील अग्रगण्य संघटनने मार्फत सन 2022 चा महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित राणे, कामगार नेते व संपादक दैनिक मुंबई मित्र, दीपाली भोसले-सय्यद मराठी सेने अभिनेत्री, अनिल थत्ते ज्येष्ठ पत्रकार, डॉ प्रवीण निचत अध्यक्ष होम फाउंडेशन, खानोलकर लेखक व साहित्यिक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्राधान्य करण्यात आला. 

संजय गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे विविध सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार व राजकिय संघटना व प्रतिष्ठीत व्यक्तींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog