🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

डोंबिवली ते पाली सायकलवर प्रवास करून तरुणांनी दिला अनोखा मोलाचा संदेश

कोलाड : प्रतिनिधी 

डोंबिवली ते पाली असा सायकलवरून प्रवास करणाऱ्या तरुणांनी प्रत्येक सायकला विविध प्रकारचा पुठ्यांच्या फलक लावून त्या फलकावर झाडे लावा झाडे जगावा,नेत्र दान करा,सायकल चालवा प्रदूषणाला आला घाला, सायकल चालवा निरोगी रहा अशा विविध प्रकारचा संदेश तरुणांनी दिला.

गेली अनेक वर्षापासून माघी गणेश उत्सहासाठी हे तरुण डोंबिवली ते पाली प्रवास करीत असून सायकल चालवून यातून जनतेला एक संदेश दिला जातो. दिवसेंदिवस वातावरणात होणारे बदल याला आपणच जबाबदार आहोत सायकल चालवून आपण निरोगी राहू शकतो तसेच गाडी चालवून पेट्रोल जाळून होणारे प्रदूषण टाळू शकतो यात पैशाचीही बचत होऊ शकते. तसेच नेत्रदान करून कोणाची तरी दृष्टी आणू शकतो तसेच झाडे लावून ती जगवल्यावर निसर्गात होणारा बदल थांबेल अशा विविध प्रकारचे महत्वाचे संदेश यातून लोकांना देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog