रोहा शहरात पोलीस चौकीच्या बाजूला अवैध चक्री जुगाराचा अड्डा!
पोलीसांच्या नाकाखाली अवैध धंदा, कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर
धाटाव/रोहा : किरण मोरे
रोहा शहरातील पोलीस चौकीच्या बाजूलाच ऑनलाईन चक्री जुगाराचा बोकायदेशीर अड्डा राजरोसपणे सुरू असल्याने येथे पोलीसांचा निष्क्रीयपणा समोर आलेला आहे. येथे राजकीय क्षेत्रातील लोकांची वर्दळ पाहता या जुगारावर राजकीय वरदहस्त असल्याचे दिसत आहे. या बेकायदा चक्री जुगारावर कारवाई होत नसल्याने पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्याचे स्पष्ट होत चालले आहे. त्यामुळे या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आल्याचे दिसून येत आहे.
या ऑनलाईन चक्री जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली आहे. याबाबत रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली असून हा अवैध चक्री जुगार बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.