रोहा तालुका आगरी ज्ञाती समाज्याचे संस्थापक/अध्यक्ष व माजी रा.जि.प. सदस्य कै. चांगदेव निरकर यांचे प्रथम वर्ष श्राद्ध
धाटाव : रोहा : किरण मोरे
रोहा तालुक्यातील ५२ गाव आगरी ज्ञाती समाज्याचे संस्थापक/अध्यक्ष व माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य कै. चांगदेव सहदेव निरकर यांचे प्रथम वर्ष श्राद्ध दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.
बिरवाडी तर्फे धोंडखार या गावचे आगरी समाजातील सामान्य शेतकरी कुटुंबात ते जन्माला आले होते. त्यांची तशी परिस्थिती बेताची होती. प्राथमिक शिक्षण घेत असतांनाच त्यांना समाजकार्याची ओढ लागलेली असायची.
सामाजिक कार्यात ते सक्रिय भाग घेत असताना समाजातील बुजूर्ग मंडळींना त्यांचा हेवा वाटत असे.
लहानपणी जास्त करून ते ज्येष्ठांच्या सानिध्यात असायचे त्यातुनच त्यांना मोठ मोठे निर्णय घेण्याचे धाडस अवगत झाले असावेत असेही त्यांच्या शिष्यगणांनाचे मत आहे.
त्यांनी अनेक वर्षे समाज्याची निष्काम सेवा केली.समाज संघटीत करण्यासाठी ते धोंडखार ते तालुक्यातील वेगवेगळ्या गावी सायकलने प्रवास करत असायचे. पुढे पुढे त्यांना घरची आर्थिक परिस्थिती पहाता पगाराच्या थोडक्या का होईना अशा एका संस्थेत काम करुन समाज हिताचे काम पहात असत.
त्यावेळची परिस्थिती फार खराब असल्याने त्यांच्या नंतरच्या पिढीतील मुलाबालांचा शैक्षणिक प्रश्न भेडसावत असे.
शहराकडे जायला मुळात लोकांना सायकल किंवा बैलगाडी हाच पर्याय असायचा त्यातून त्याचे गाव तालुक्याच्या टोकावर म्हणून दिवसरात्र एक करून समाज बांधव संघटीत करून भविष्यातील अडचणी समाजातील जाणकार लोकांच्या कानावर घातल्या.
त्यानुसार समाजातील मंडळी संघटीत झाली आणि बघताबघता ५२ गावे एकत्रित येऊन एक मोठा संकल्प केला तो म्हणजे रोहे शहरात वस्ती गृह निर्माण करण्याचा त्या करीता जागा मिळणे,संस्था रजिस्टर करणे वास्तु बांधने या सर्व करण्या करिता अर्थ व श्रमदान महत्त्वाचे होते.
रोहे तालुक्यातील ५२ गावातील खंबीर पाठींब्यामुळेच अवघड गोष्टी सोप्या होऊ लागल्या आणि विविध सहकारी संस्थचे सेक्रेटरी असलेल्या निरकरांनी सहकारी मंडळींना घेऊन आगरी ज्ञाती सेवा मंडळ,संस्था नोंदणी कायदा १८६० या अॅक्ट खाली मंडळ स्थापन केले.
रोहे तालुका ५२ गाव संस्थापक/अध्यक्ष, १३वर्षे रायगड जिल्हा परिषदेत सदस्य, कोकबन येथे जे.बी.सावंत न्यू इंग्लिश स्कूल चे निर्माते. कोकबण येथील शासकीय उपआरोग्य सेवा केंद्र.(रुग्णालयात) बंद अवस्थेत होता तो लोक सहकारातून चालू केला. चणेरा येथील सुडकोळी सहकारी सोसायटीच्या भात गिरणीचे संचालक म्हणून तर धोंडखार ग्रृप ग्राम पंचायत मध्ये सदस्य, आणि सेवा निवृत्त होईपर्यंत धोडखार ते न्हावे या विभागातील विविध सहकारी संस्थेचे सेक्रेटरी म्हणून काम केले. तसेच गोफण ते साळाव विभागातील पहिले श्री समर्थ बैठकीचे श्रवण हाॅल धोंडखार येथे होण्याकरीता मार्गदर्शक म्हणून लाभले.
कै. चांगदेव निरकर यांनी समाज कार्य करत असताना कधीही स्वताचा सार्थ पाहिला नाही. नेहमीच हरतमुख स्वभावाच्या कै. निरकरबाबा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार असुन ते यह लोकांतून गेल्या वर्षी निर्वाण पावले. रोहा तालुका ज्ञाती मंडळच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.