कोलाड येथे मटका माफीयांचा धुमाकूळ!
कोलाडमध्ये पोलीस जिवंत आहेत का? नागरिकांचा संतप्त सवाल!
कोलाड पोलीसांना १ लाखाचा हफ्ता? कोलाडमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर
धाटाव/रोहा : किरण मोरे
रोहा तालुक्यातील कोलाड येथे मटका जुगार माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून येथील अवैध धंद्यांवर अद्यापही कारवाई होत नसल्याने येथे पोलीस जिवंत आहेत का? असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
येथे बेकायदा मटका जुगार व चक्री जुगार सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे.
येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांना मटका जुगार माफीयांकडून हफ्ता पोहोचत असल्यामुळे त्यांनी या अवैध धंद्यांना परवानगी दिल्याचे स्पष्ट होत चालले आहे.
येथे मटका जुगार जोमात सुरू असल्यामुळे पोलीसांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. येथील बेकायदा जुगारामुळे पोलीसांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे चर्चिले जात असून मटका माफीयांकडून पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्याचे बोलले जात आहे.