🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ, पोलीसांचे दुर्लक्ष! 

चक्री जुगारामुळे अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर 

धाटाव/रोहा : किरण मोरे

रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा मायाजाळ पसरलेला असून असून अनेक जुगारवेडे तरूण यामध्ये गुरफटत चालले आहेत. येथील बेकायदा चक्री जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. या चक्री जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. 

रोहा शहरातील धावीर मार्केट, रायकर पार्क, खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला आणि नवरत्न हॉटेलच्या परिसरात असे एकूण ४ ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून या ऑनलाईन जुगाराच्या नादाने अनेक जुगारवेड्या तरूणांनी घरातील महिलांचे दागिने विकल्याचे धक्कादायक प्रकार देखील यापूर्वी घडलेले असून काही ठिकाणी घातपाताच्या घटना देखील घडलेल्या आहेत. 

त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तातडीने सदरच्या ऑनलाईन चक्री जुगारावर कारवाईचे आदेश देऊन हा अवैध चक्री जुगार बंद करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.


Comments

Popular posts from this blog