🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

दीपक नायट्रेट कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक हैराण, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष!

धाटाव/रोहा : किरण मोरे

रोहे शहराला लागुन असलेल्या धाटाव औद्योगिक परिसरात प्रदूषणाचे तांडव सुरू असून यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड हैराण झालेले. या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे.

येथील दीपक नायट्रेट कंपनीतून तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरविले जात असून पहाटेच्या धुक्याचा फायदा घेऊन व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन प्रदूषण पसरविण्यात ही कंपनी पटाईत असल्याचे दिसून येत आहे. धुक्यातून प्रदूषणाचा अनुभव येथील नागरिकांना नेहमीच येत असून सकाळी मोकळी हवा घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या प्रदूषणाच्या हातचालाखीकडे प्रदुषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा येथील स्थानिकांचा आरोप आहे. 

प्रदूषण हे या परिसरातील नागरिकांच्या पाचवीला पूजल्याची संतप्त प्रतिक्रीया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. वाढत्या प्रदुषणामुळे या परिसरामध्ये दमा, खोकला यांसारखे श्वसनाचे आजार वाढुन येथील वैद्यकीय यंत्रणाना श्वसनाचा आजार सुरु झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. याचा त्रास प्रामुख्याने लहान बालके व वृद्ध मंडळीना होत आहे. दीपक नायट्रेट कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण बाहेर पडत असून या कंपनीचे अधिकारी नितीन डांगडे यांचे या परिस्थितीवर कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसल्याचे दिसून आलेले आहे.

या प्रदुषणामुळे नागरिकांना सकाळ संधाकाळ फिरणे मुश्कील झाले असुन येथील जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आलेले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog