अस्लम शेख यांचे पालकमंत्री पद रद्द करा !

मालवणी येथील क्रीडासंकुलाचे ‘टिपू सुलतान क्रीडासंकुल’ नामकरण अनधिकृत असल्याने रद्द करा : हिंदु जनजागृती समितीची मागणी  


कोलाड : निलेश महाडिक

मुंबईच्या शिवसेनेच्या महापौरांनी मालाड मालवणीतील क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानाचे नाव देण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे आज जाहीर केले आहे. तसेच पर्यावरणमंत्री मा. आदित्य ठाकरे यांनीही अद्याप हे नामकरण मंजूर झाले नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या क्रीडासंकुलाला दिलेले ‘टिपू सुलतान’ हे नामकरण अनधिकृत असल्याने ते प्रथम रद्द करण्यात यावे आणि त्या क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावर लावलेला या नावाचा फलकही काढून टाकण्यात यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोणताही प्रस्ताव संमत न करताच मालवणी येथील क्रीडासंकुलाला ‘टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नाव देऊन बेकायदेशीर कृती केली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची, तसेच त्यांचे पालकमंत्रीपद रद्द करण्याची मागणीही समितीने केली आहे.

Comments

Popular posts from this blog