🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

लायन्स क्लब आयोजित चिल्हे येथील नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद ११५ रुग्णांची तपासणी, ३० रुग्णांवर होणार शस्त्रक्रीया

कोलाड : प्रतिनिधी

लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग, समता फाऊंडेशन मुबंई, गोदरेज फाऊंडेशन, लायन हेल्थ फाऊंडेशन व झोन चेअरपर्सन ,यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुप ग्राम पंचायत तळवली तर्फे अष्टमी व चिल्हे ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून 30 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रियेला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये 115 रुग्णांची तपासणी तर 30 रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

यावेळी कोलाड रोहा लायन्स क्लबचे मार्गदर्शक तथा झोन चेअरपर्सन लायन रविंद्र घरत, कोलाड रोहा लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. सागर सानप, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे, खजिनदार डॉ. श्याम लोखंडे, बोर्ड ऑफ डायरेक्टर अनिल महाडिक, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग डॉ. स्मिता चौगले, डॉ. सायली केणी, सुजित पाटील, शुभम जाधव, चेतना पॅथॉलॉजीच्या डॉ. समृद्धी राणे, श्रुती ऑप्टिकल कोलाडचे विठ्ठल सावळे, ग्राम पंचायत सरपंच सौ. रुपाली कोस्तेकर, उपसरपंच सौ. मानसी लोखंडे, सदस्या सौ. रिया लोखंडे, मा.उपसरपंच रघुनाथ कोस्तेकर, गावचे अध्यक्ष सुधीर लोखंडे, मंगेश लोखंडे, लायन नंदकुमार कळमकर, कल्पेश माने, राजेंदर कोप्पू, महेश तुपकर, सौ. पूजा लोखंडे, ज्येष्ठ नागरिक गणपत शिंदे, सुरेश महाडिक, दगडू लाडगे आदी मान्यवर, ग्रामस्थ व रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना नेत्र तपासणीचा व त्यांच्यावरील मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळावा यासाठी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी अधिक परिश्रम घेऊन या भागात काम करीत असल्याचे मनोगत लायन रविंद्र घरत लायन डॉ. सानप, डॉ. स्मिता चौगले व गावचे अध्यक्ष सुधीर लोखंडे यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळ चिल्हे यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog