पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
पनवेल : प्रतिनिधी
पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्था नवीन पनवेल ची स्थापना 1 जानेवारी 2021 रोजी केले होती यासंस्थेचा आज प्रथम वर्धापन दिन पंचशील बुद्ध विहाराच्या प्रांगणात पंचशील नगर येथे सायंकाळी 7 वाजता सुरू करण्यात आला.
यावेळी महापुरुषांना वंदन करून तसेच भीमा कोरेगावच्या पराक्रमी शुराना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेने केलेल्या कामाचा आढवा घेऊन संस्थेने अध्यक्ष शंकर मारुती वायदंडे यांनी संस्थेला वेळोवेळी सहकार्य मदत करणाऱ्या कमिटी पदाधिकारी सदस्य नागरिक तसेच हितचिंतक या सर्वाचे आभार मांडले.
यावेळी संस्थेची वर्षभरातील कामे लॉकडाऊन मधील पंचशील नगर सेनीटायझ करणे मोफत गरीब गरजूलाअन्नदान,पोलीस बांधवाना चहा पाणी वाट, गरिबांना कपडे वाटप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, लहुजी साळवे जयंती, स्वतंत्र दिन, ईद निमित्त अन्नदान शिरखुरमा वाटप पंचशील बुध्द विहाराला लादी बसवणे, आर.टी.ई. मधून मुलांचे ऍडमिशन फॉर्म भरून मतदान नोंदणी आवाहन आरोग्य कार्ड वाटप असे अनेक सामाजिक कामे बॅनर लावून वाचन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या कमिटीचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुलांना कलेला वाव देण्यासाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व मुलांना प्रशस्तीपत्रक व पहिल्या चार स्पर्धकाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सर्वाचा संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार, सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, सहसंघटक संतोष जाधव, सहखजिनदार अजय दुबे, सदस्य संतोष ढोबळे, विनोद तायडे, अमेय इंगोले, हेमा रोड्रिंक्स आदींसह रहिवाशी सुनील वानखेडे सीताराम पोपलवार आदी अनेक रहिवाशी नागरिक, महिलावर्ग उपस्थित होते
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अमन तायडे, उमेश पलमाटे, रवी पोपलवार, लुहू लंके यांच्यासह अनेक मुलांचे सहकार्य लाभले