कोलाडमध्ये मटका जुगार आणि ऑनलाईन चक्री जुगार, पोलीसांना मिळतोय हफ्ता!

कोलाडचे पोलीस बनलेत मटका माफीयांच्या ताटाखालचे मांजर? 

मटका बंद न झाल्यास येथील प्रभारी अधिकारी सुभाष जाधव यांच्यावर कारवाई करा : ॲड. काशिनाथ ठाकूर यांची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार

रायगड : प्रतिनिधी

पूर्वीच्या काळात "पोलीस" म्हटले की जनतेचे रक्षण करणारा एक रूबाबदार चेहरा समोर येतो. पण हल्लीच्या काळात "पोलीस" म्हटले की अवैध धंदे करणाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर? असे संतापाने म्हटले जाते! कारण सध्याची परिस्थिती पाहता पोलीसांना आपल्या ड्युटीचा विसर पडलाय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण कोलाड येथील पोलीस हे जनतेचे रक्षक बनण्यापेक्षा अवैध धंदे करणाऱ्यांचे रक्षक बनल्याचे बोलले जात आहे. येथील पोलीसांना भीक लागली असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या पगारातून यांना स्वतःचे कुटूंब पोसता येत नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांकडून हफ्ते घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह करण्याची नामुश्की येथील पोलीसांवर आल्याचे चर्चिले जात आहे.

रोहा तालुक्यातील कोलाड नाका येथे सध्या बेकायदा मटका-जुगार एकूण ३ ठिकाणी सुरू असून एका ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगार तेजीत सुरू असून अनेक तरूण व वयोवृद्ध या मटका जुगाराच्या आहारी गोल्याचे दिसत आहे. या ऑनलाईन जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. 

येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कोलाड नाका येथील मटका जुगाराचे धंदे बंद करण्याची कारवाई करावी व मटका जुगार बंद न झाल्यास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.

Popular posts from this blog