प्रा. आमलपुरे सूर्यकांत यांना निलक्षणा शोध रत्न पुरस्कार जाहीर
कोलाड : प्रतिनिधी
कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट चे डाॅ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कॉलेज कोलाड येथील हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. आमलपुरे सूर्यकांत विश्वनाथ यांना २०२१ या वर्षीचा विलक्षणा एक सार्थक पहल समिती अजायब, हरियाणा येथुन त्यांच्या एकंदरीत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन तसेच संशोधन कार्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करून या वर्षी चा विलक्षणा शोध रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रा. आमलपुरे सूर्यकांत हे गेली १२ वर्षांपासुन शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून अध्यापनाबरोबरच संशोधनाचे कार्य सुरू असते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ४० पेक्षा अधिक शोध निबंध लिहिले असून ४० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रात सहभागी झाले आहेत. हिंदी मध्ये ३ पुस्तके लिहिली असून मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत माईनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. त्यांना आतापर्यंत ८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देण्यात आले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे ट्रस्टी श्री. संदीपजी तटकरे संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेततर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील सर्व प्राध्यापक मित्रमंडळींनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment