ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांची यांची वार्षिक सहल उत्साहात संपन्न 

कोलाड : प्रतिनिधी

स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांची वार्षिक सहल मंगळवार दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली.

स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड या मंडळाची स्थापना झाल्यापासून दरवर्षी वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात येते. परंतु गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात आले नव्हते. परंतु या वर्षी सर्वत्र बंदी उठविल्यानंतर यावर्षी कोलाड ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वार्षिक सहलीचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी कोलाड ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष मारुती राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मुगावली येथील स्वयंभु गणपती मंदिर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन येथील सोमजाई मंदिर व दिवेआगर येथील सोन्याचा गणपती येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडळाच्या १०० सदस्यांनी सहभाग घेतला. कार्यकारी मंडळ व सर्व सदस्य यांच्या पुढाकाराने ही वार्षिक सहल उत्साही वातावरणात संपन्न झाली.

.

Comments

Popular posts from this blog