कोलाडमध्ये मटका माफीयांचा धुमाकूळ, अवैध मटका जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष 

कोलाड येथील मटका जुगार कायमस्वरूपी बंद करावा : ॲड. काशिनाथ ठाकूर यांची मागणी 

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण आहे का?

रायगड : किशोर केणी

रोहा तालुक्यातील कोलाड येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून येथील अवैध मटका जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. 

रोहा तालुक्यातील कोलाड येथे सध्या बेकायदा मटका-जुगार सुरू असून अनेक तरूण व वयोवृद्ध या मटका जुगाराच्या आहारी गोल्याचे दिसत आहे. या मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. 

येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन येथील मटका जुगाराचे धंदे बंद करण्याची कारवाई करावी व या अवैध मटका-जुगाराला साथ देणाऱ्या पोलीसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog