रोहा शहरातील ऑनलाईन चक्री जुगार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

धाटाव/रोहा : किरण मोरे 

रोहा शहरात सध्या बेकायदा ऑनलाईन चक्री जुगार राजरोसपणे सुरू असून या अवैध धंद्याकडे पोलीसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. सदरचा अवैध धंदा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

रोहा शहरातील धावीर मार्केट, रायकर पार्क, खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला आणि नवरत्न हॉटेलच्या परिसरात असे एकूण ४ ठिकाणी ऑनलाईन चक्री जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. रोहा तालुक्यात ऑनलाईन चक्री जुगार चालकांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून या ऑनलाईन जुगाराच्या नादाने अनेक जुगारवेड्या तरूणांनी घरातील महिलांचे दागिने विकल्याचे धक्कादायक प्रकार देखील यापूर्वी घडलेले आहेत. सदरचे ऑनलाईन चक्री जुगारचे धंदे या परिसरात धुमधडाक्यात सुरू असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने हा चक्री जुगार बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

Popular posts from this blog