रोहा आणि कोलाडमध्ये ऑनलाईन चक्री मटका, पोलीसांचे दुर्लक्ष! 

ऑनलाईन चक्री मटका कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

धाटाव/रोहा : किरण मोरे 

रोहा शहरात व कोलाड नाका येथे सध्या बेकायदा ऑनलाईन चक्री मटका तेजीत सुरू असून अनेक तरूण व वयोवृद्ध या ऑनलाईन जुगाराच्या आहारी गोल्याचे दिसत आहे. या ऑनलाईन जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.

सध्या रोहे शहरातील धावीर मार्केट, रायकर पार्क, खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला आणि नवरत्न हॉटेलच्या परिसरात असे एकूण ४ ठिकाणी आणि कोलाड नाका येथे ऑनलाईन जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.

रोहा तालुक्यात ऑनलाईन चक्री मटका चालकांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून या ऑनलाईन जुगाराच्या नादाने अनेक जुगारवेड्या तरूणांनी घरातील महिलांचे दागिने विकल्याचे धक्कादायक प्रकार देखील घडलेले आहेत. सदरचे ऑनलाईन चक्री मटका जुगारचे धंदे या परिसरात धुमधडाक्यात सुरू असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तातडीने हा चक्री मटका बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog