अखेर भानंग गावातील पाणीपुरवठ्याच्या कामास सुरवात
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
तळा : संजय रिकामे
तालुक्यातील भानंग गावातील गेल्या तीस वर्षांपासून रखडलेल्या पाणी पुरवठ्याच्या कामास रविवार (ता.7) रोजी सुरुवात झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.या पाणीपुरवठ्याच्या कामाचे अंदाजपत्रक व निविदा शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मंजूर होऊन कार्यारंभ आदेश दिलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले भूमिपूजन ही केवळ ग्रामस्थांची केलेली दिशाभूल होती. या कामाचा शुभारंभ शिवसेनेकडून केला जाईल असा शब्द शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी दिला होता त्या शब्दाला जागून त्यांनी आज 54 लाख भानंग पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सुरवात श्रीफळ वाढवून केली.
याकामी ही पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून ग्रामस्थांची अडचण दूर होण्यासाठी शिवसेना तळा तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ हे लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करित होते. त्यांच्या या लढ्यास अखेर यश आले आले. या पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लावत असताना मात्र सातत्याने काहीतरी अडचणी निर्माण होऊन ते सुरू होत नव्हते. अखेर अलिबाग विधानसभेचे शिवसेनेचे लोकप्रिय आ. महेंद्रशेठ दळवी यांनी या विषयामध्ये लक्ष घातले व जिल्हा परिषद मुख्याधिकारी पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा व संबंधित अधिकारी यांच्यांत समन्वय घडवून आणला. यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने अखेर रविवारी रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या हस्ते व तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ, भानंग ग्रामपंचायत सरपंच रघुनाथ वाघरे, उपरपंच सुहानी भौड, माजी सरपंच नाना दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी शहर प्रमुख राकेश वडके, उपतालुकाप्रमुख शरद सारगे, काकडशेत मुंबई संपर्क विभागप्रमुख दिनेश रामाणे उपविभागप्रमुख संतोष वाघरे, शाखाप्रमुख सुरेश धाडवे, ग्रामपंचायत सदस्या सुलोचनाताई रेवाळे, जेष्ठ शिवसैनिक यशवंत वाघरे, पांडुरंग वाघरे, मधुकर शिगवण, महादेव वाघरे, राजेश रेवाळे, शांताराम पवार, अनिल रेवाळे,सुधाकर शिगवण, वसंत वाघरे, नमित पांढरकामे, नगरसेवक चेतन चव्हाण, विठोबा चांडीवकर ,लीलाधर खातू , तसेच समस्त भानंग ग्रामस्थ, मुंबईकर,महिला मंडळ आणि तमाम शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित तसेच परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण पाणीपुरवठा जल जीवन मिशन अंतर्गत तळा तालुक्यातील भानंग गावासाठी 54 लक्ष अंदाज पत्रकीय रक्कम पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आली आहे.या कामाचे एकाच दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिपूजन करण्यात आले होते राज्यात महाआघाडीचे सरकार असेल तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये विस्तव सुध्दा जात नाही राष्ट्र्वादीचा प्रत्येक नेता भानंग पाणीपुरवठा योजना मीच मंजूर करून आणली असा दावा करत होते पण यावर शिवसेनेने मात करून रविवारी या कामाची सुरवात करून हे काम शिवसेनेकडून मंजूर झाले असल्यावर शिकामोर्तब केले असल्यााचे बोले जात आहे.
Comments
Post a Comment