ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागोठणे विभागाचा जाहीर मेळावा पिगोंडे येथे संपन्न

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी

रायगडचे भाग्यविधाते खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत पिगोंडे येथे नागोठणे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा दिनांक १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पिगोंडे ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीचे लोकार्पण सोहळा आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते पार पडला.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, विकासाची कामे होत राहतील, रोजगाराचे प्रश्न आपण सोडवणार आहोतच पण उद्याच्या भविष्याच्या काळासाठी आपल्याला अधिक चांगल काम कसं करता येईल याचाही प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पण त्यासाठी संघटनेच्या मजबुतीच्या कामाला लागा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोहा तालुका बालेकिल्ला यापूर्वी सुद्धा राहिला आणि उद्याच्या भविष्यात सुद्धा राहील या साठी सर्वांनी एकत्र राहून काम करा. आज शिक्षणाच्या क्षेत्रात रायगडच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या सततच्या पाठपुराव्याने आज रायगड मध्ये आपण मेडिकल कॉलेज सुरु करत आहोत. आपल्या विभागातील तरुण तरुणींना डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. निवडणूका येतात जातात जय पराजय होत राहतील पण नागोठणे सोबत जोडलेली आमची नाळ चिरकाल टिकणारी आहे. आगामी निवडणुकीत आघाडी बाबत बोलताना ते म्हणाले कि पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्या प्रमाणे पुढील रूपरेषा ठरणार असल्याचे ते म्हणाले.

या मेळाव्यासाठी खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी, नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, शिवराम शिंदे, सदानंद गायकर, भाई साहेब टके, चंद्रकांत गायकर, जयवंत मुंडे, अनिल काळे, हरीश काळे, प्रकाश मोरे, राजेंद्र धात्रक, राजेशमेहतर, चंद्रकांत गायकवाड, मधुकर ठमके, प्रकाश जैन, उदय जवके, विलास चौलकर, प्रमोद जांभेकर, दिनेश घाग, सचिन कळसकर, युवक पदाधिकारी, महिला पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog