साहित्यविश्व दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

रायगड (किशोर केणी) : अलिबाग येथील साहित्यविश्व दिवाळी अंक २०२१ या बाराव्या अंकाचे दिमाखदार प्रकाशन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तुषार शासकीय विश्रामगृह येथे पार पडले.

संपादक सौ. प्रमिला जोशी यांनी आपल्या स्वागतपर शब्दात यावेळी भविष्याचा वेध घेणाऱ्या विविध शास्त्रांची संकल्पना मांडली. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी भविष्याला सामोरे जाण्यासाठी अंक नक्कीच प्रेरणादायी ठरेल, या शुभेच्छा देतानाच अलिबागचा विकास आणि इतर प्रश्नांवर नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याशी चर्चा केली. लवकरच काही सुधारणांसह अलिबागच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे अभिवचन दिले. या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच स्थानिकांना सांस्कृतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न असेल अशी भावना व्यक्त केली. अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीही शुभेच्छा देत, अंकाचे कौतुक केले. मिस टीन युनिव्हर्स अपूर्वा ठाकुर यांनीही यावेळी अभिमानास्पद वाटत असल्याची भावना व्यक्त केली.

याप्रसंगी अलिबागच्या माजी नगरसेविका सौ. कविता ठाकूर, रिलायन्स समूहाचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, नामांकित वकील प्रसाद पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, साहित्यिक महेश कवळे, फिजिओथेरपिस्ट प्रमोद म्हात्रे, भावेश्री वाळंज, संतोष पेडणेकर, उपेंद्र नारकर, धीरज जोशी, जय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कवळे यांनी तर आभार प्रदर्शन रमेश धनावडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog