नागरिकांनो सावधान!! हनी ट्रॅपमध्ये अथवा मुलीच्या मॅटरमध्ये तरूणांना अडकविण्याची नवीन पद्धत उघडकीस आलीय!
माणगांव तालुक्यातील भामट्याच्या घाणेरड्या कारस्थानाचा पर्दाफाश
माणगांव (प्रतिनिधी) : माणसाने किती घाणेरडे वागावे याला पण काही मर्यादा असते, परंतु माणगांव तालुक्यातील एका उनाड भामट्याने तर ही मर्यादाच ओलांडल्याचे उघडकीस आलेले आहे.
माणगांव तालुक्यातील हा भामटा लोकांना फसविण्यात पटाईत असेल पण यावेळी मात्र तो ज्याला फसवणार होता त्यानेच त्याच्या घाणेरड्या कृत्यांचा पर्दाफाश केला आहे. माणगांव तालुक्यातील एका माणसाच्या मुलीसाठी रोहा तालुक्यातील एका माणसाचे स्थळ आले होते. रितीरीवाजा प्रमाणे त्या मुलाचे वडिल व काका त्या मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी गेले, माणुसकीच्या दृष्टीने चांगला पाहुणचार पण झाला. त्यानंतर ते पाहुणे मुलीच्या घरातून निघून गेले आणि त्यानंतर एका तासात संबंधित मुलीने स्वतः सदर मुलाच्या वडिलांना कॉल करून नकार दिला!
परंतु या मुलीचा बाप इतका घाणेरडा आहे की या भामट्याने या प्रकरणावरून काही लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या हरामखोराने असा गोंगाट केला की, "माझ्या मुलीला चांगले इंजिनीयरचे स्थळ आले होते, पण "ह्या" माणसाने ते फिस्कटवले!"
त्यामुळे ही ब्लॅकमेलींगची नवीन प्लॅनिंग असल्याचा संशय निर्माण झाला आहे. मात्र, या भामट्याने ज्यांना-ज्यांना कॉल करून हा आगावपणा केला त्यांनी तर या भामट्याची रेकॉर्डींग व्हायरल केली. त्यामुळे या ब्लॅकमेलर भामट्याची प्लॅनिंग फिस्कटली!!
अशी फसवणूक कुणाचीही होऊ शकते. म्हणून माणगांव तालुक्यात मुलासाठी स्थळ शोधताना लोकांनी सावध रहावे!
(भामट्याविषयी यापुढील विशेष बातमी वाचा लवकरच..!!)
Comments
Post a Comment