🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

को. म. सा. प. शाखा तळा तर्फे मितल वावेकर गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

तळा (संजय रिकामे) : माजी राष्ट्रपती शिक्षण महर्षी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर जन्म दिनी म्हणजेच जागतिक शिक्षक दिनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळाच्या वतीने प्राथमिक मराठी शाळा वानास्ते येथील शिक्षिका मितल सुहास वावेकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तळा येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार अं. वि. जंगम, अध्यक्ष हेमंत बारटक्के, कार्याध्यक्ष संदीप जामकर, सचिव विजय पवार, संस्थापक तथा ज्येष्ठ पत्रकार पुरूषोत्तम मुळे, शिक्षक संघटना अध्यक्ष विजय येलवे, अमिश भौड, राजू थिटेकर, कल्याणी वाजे, गहिनीनाथ उस्तुरे, श्री. घुटूकडे उपस्थित होते.

मितल (मुळे) वावेकर या एम ए बीएड उच्च पदवीधर असून गेली २० वर्षे प्राथमिक शिक्षिका कार्यरत आहेत विद्यार्थी हेच माझे दैवत समजून सेवा बजावत आहेत. शैक्षणिक सांस्कृतिक, क्रिडा, क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थी घडविले आहेत. प्रभावी अध्यापन संस्कृत भाषा आवडीचा विषय, उत्कृष्ठ सुत्रसंचालन, वाचन, लेखन स्वतःसह विद्यार्थ्यांना घडवीत असल्याने त्यांच्यासारख्या प्रामाणिक शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा निश्चितच वाढतआहे. अशा गुणवंत शिक्षकेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या गुणवंत शिक्षिकेचा सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog