🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

भरधाव ट्रेलरची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार, चालक फरार!

कोलाड (प्रतिनिधी) : मुबंई-गोवा महामार्गाला जोडल्या गेलेल्या कोलाड सुतारवाडी महामार्गावर अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली असून भरधाव ट्रेलरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सुतारवाडी येथील ढोकलेवाडी नजीक घडली आहे. या अपघातानंतर ट्रेलरचा चालक फरार झाला आहे. 

याबाबत कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड कडून सुतारवाडीकडे भरधाव जाणारा ट्रेलर क्रमांक एम एच 048 ए जी 5370 तर सुतारवाडी कडून येणारी दुचाकी वाहन क्रमांक एम एच 06 ए व्ही 2539 चालक मंगेश प्रकाश हिलम (वय 20, रा. निळज, ता. माणगांव) हा सुतारवाडीकडून कोलाडच्या दिशेने येत असताना ढोकळेवाडी येथील वळणावर ट्रेलर चालकाने दुचाकीस्वार मंगेश हिलम यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात मंगेश हिलम यांचा दुर्दैवी अंत झाला असून मालवाहू ट्रेलर चालक हा पसार झाला असल्याने या बाबत एकच संतप्त व्यक्त केला जात आहे. 

सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली असून कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 77/2021 भा.द.वि. कलम 304 (ए) 279, 337, 338 मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184,134 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. आर. माने अधिक तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog