🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 35 मि.मी. पावसाची झाली नोंद

धाटाव/रोहा (किरण मोरे) : रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 35.61 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3216.35 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
अलिबाग- 16.00 मि.मी., पेण- 43.00 मि.मी., मुरुड- 15.00 मि.मी., पनवेल- 30.60 मि.मी., उरण-26.00 मि.मी., कर्जत- 77.40 मि.मी., खालापूर- 36.00 मि.मी., माणगाव- 22.00 मि.मी., रोहा- 30.00 मि.मी., सुधागड-21.00 मि.मी., तळा-54.00 मि.मी., महाड- 19.00 मि.मी., पोलादपूर-47.00 मि.मी, म्हसळा- 25.00 मि.मी., श्रीवर्धन-25.00 मि.मी., माथेरान- 82.70 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 569.70 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 35.61 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 100.00 टक्के इतकी आहे.

Comments

Popular posts from this blog