कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियन या निवडणुकीत बहुमतानी विजय संपादन करणार : दिवाकर देव
साई/माणगांव (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेची 2021ची निवडणूक ही चूर्शीची होणार असून या निवडणुकीत कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियन आणि शिवसेना पुरस्कृत रेल कामगार सेना यांची युती असून या युतीचा बहुमतांनी विजय संपादन करणार असल्याचे जनरल सेक्रेटरी दिवाकर देव (बाबी) यांनी प्रतिपादन केले. निवडणुकीसंदर्भात ते माणगाव मध्ये बोलत होते.या निवडणुकीमध्ये कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनला ऑल इंडिया sc/st असोसिएशन, ऑल इंडिया एम्प्लॉईज युनियन, पॉईंटमन असोसिएशन, ट्रक मन असोसिएशन यांचा पाठिंबा आहे. नारळाचे झाड या निवडणुकीत आमची निशाणी चिन्ह आहे.
रोहा रेल्वे स्टेशन पासून ते ठुकूर रेल्वे स्टेशन पर्यंत 26 बूथ असून जवळ जवळ 5 हजार मतदार संख्या आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांनी मागील काही वर्षांपासून कामगारांची फसवणूक केलीआहे. या निवडणुकीत नॅशनल युनियनचा पराभव करून हाकलून देणार तसेच या निवडणुकीत विजय झाला की कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळवून देणार आहोत. 2400 रुपयांची वाढ मिळवून देणार, कामगारांना त्यांची हक्काची पेन्शन मिळवून देणार अशी प्रतिक्रिया दिवाकर देव यांनी व्यक्त केली.
सन 2014 पासून लाल बावटा नेतृत्वानी कायम अत्याचार अन्याय केला असून कोकण रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा डाव हाणून पडणार असून कामगारांची दिशाभूल ते करीत आहेत. सदरची निवडणूक ही 4 व 5 ऑगस्ट रोजी होणार असून नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा दारुण पराभव आम्ही करणार आहोत.
या वेळी जॉईंट जनरल सेक्रेटरी नरेंद्र शिंदे, ऑल इंडिया sc /st असोसिएशन कोषध्यक्ष मिलिंद गायकवाड, गजानन गायकर, जयसिंग देशमुख, दत्तात्रेय तेलंगे, संतोष शेलार, भरत शर्मा, मल्हारी बटाटे, अच्युत पाटील, सुनील गांधे, प्रशांत सुतार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment