यशवंतखार-सानेगाव ग्रामस्थांचा महाड पुरग्रस्त नागरिकांना "एक हात मदतीचा" 

युवा नेतृत्व संतोष भोईर यांचा पुढाकार

रोहा (रविना मालुसरे) : नुकत्याच आलेल्या महापुराने महाड शहर व ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला. पुरग्रस्त नागरिकांना अनेक सामाजिक संस्था व दानशुर नागरिकांनी सढळ हस्ते मदत केली आहे.

सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असलेले युवा नेतृत्व श्री. संतोष भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाडपुरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

गुरुवार दिनांक २९ जुलै २०२१ रोजी यशवंतखार-सानेगाव विभागातर्फे पुरग्रस्त नागरिकांना मदत सुपूर्द करण्यात आली. आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून  सुरु असलेल्या मदत वाटप प्रक्रियेत आपली सेवा बजावली.

यावेळी संतोष भोईर यांचे समवेत शामित दिवकर, तुषार ठाकूर, पांडुरंग भोईर, विठोबा गुंड, नामदेव मढवी, मंगेश सुरणकर, सचिन जांभळे, अश्विन भोपी, प्रशांत चंदने, सुभाष दिवकर, किशोर दिवकर, नितीन विभुते, जयदास चोगले, प्रशांत म्हात्रे, वसंत दिवकर, निलेश सुरणकर, मोहन म्हात्रे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog