मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे! 

रायगड प्रेस क्लबच्या बैठकीत ठराव

माणगांव (उत्तम तांबे) : मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे  असा ठराव रायगड प्रेस क्लबच्या माणगांव येथील जिल्हा कार्यकारिणीच्या बठकीत घेण्यात आला.  परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व  किरण नाईक यांच्या नेतृत्वखाली रायगड प्रेस क्लब चे पदाधिकारी यांनी यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तसे निवेदन देण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. 

रायगड प्रेस क्लबची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक माणगांव येथील रिव्हर रिसॉर्ट येथे झाली. यात प्रथम कोरोनामध्ये मृत्यू झालेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दीपक शिंदे यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. त्यानंतर जिल्हा समितीच्या नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करण्यात आले. याचबरोबर गोरेगाव प्रेस क्लबने कोरोना आपत्तीत रुग्णवाहिका सेवा दिली. तसेच महाड प्रेस क्लबनेही कोव्हीड सेंटर द्वारे रुग्णसेवा करीत असल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले. 

यावेळी प्रेस क्लब व्यतिरिक्त इतर संघटनेत काम करत असणाऱ्या पत्रकारांवर काय निर्णय घ्यावा यावर ठराव झाला असून यात तालुका अध्यक्षांनी निर्णय घेऊन जिल्हा प्रेस क्लबकडे कळवावे असा ठराव झाला. जिल्ह्यला व  राज्याला कौतुकास्पद असा कार्यक्रम प्रगतशील शेतकरी सन्मान कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात  व्हायला हवा असे स्पष्ट करण्यात आले. जिल्हा कार्यकारिणीची पुढील मिटींग मुरुड येथे होईल असे जाहीर करण्यात आले. 

याबरोबरच जिल्हा प्रेस क्लब चा पुढील  17 वा  वर्धापनदिन  माणगांव येथे होणार असून त्याबाबत नियोजनास सुरुवात करावी असे ठरले आहे.   

या जिल्हा कमिटी च्या बैठकिसाठी जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष भारत रांजणकर, कार्याध्यक्ष मनोज खांबे, माजी अध्यक्ष अभय आपटे, माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, उपाध्यक्ष प्रशांत गोपाळे, जिल्हा सचिव शशिकांत मोरे, जिल्हा संपर्क प्रमुख भारत गोरेगावकर, जिल्हा संघटक संजय भुवड, जिल्हा  सदस्य पदमाकर उभारे, देवा पेरवी, मुकुंद बेबडे, भाई ओव्हाळ, प्रवीण जाधव, राजेंद्र जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कमलेश ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी आयोजक माणगांव प्रेस क्लब चे अध्यक्ष संतोष सुतार, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, आरती म्हामुणकर, सचिव हरेश मोरे, खजिनदार सचिन वनारसे, कायदेशीर सल्लागार, डॉ. संजय सोनावणे, प्रमुख संघटक पदमाकर उभारे, प्रमुख सल्लागार उत्तम तांबे, विनोद साबळे, तसेच सदस्य वैभव टेंबे, योगेश ढेपे, पूनम धुमाळ आदींनी  योग्य आयोजन  केले.

शेवटी जिल्हा प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा सदस्य तथा माणगांव प्रेस क्लब चे संघटक पदमाकर उभारे यांनी आभार मानले. 

Comments

Popular posts from this blog