जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीला धावले.
माणगांव मधून जिल्हा पुरवठा विभागाकडून सुमारे ५००० फूड पॅकेट पूरग्रस्तांसाठी
पोलीस प्रशासनाकडून माणगांव येथे मुंबई-गोवा हायवेवर मदतीचा ओघ सुरूच
माणगांव (प्रमोद जाधव) : २२ जुलै रोजी रायगड जिल्ह्यात महाड आणि पोलादपूर तालुक्याचा काही भागात आलेला जलप्रलय अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने उघडया डोळ्यांनी पहिला.!! अत्यंत चित्तथरारक असा प्रसंग महाडमध्ये पाणी भरते हे समीकरण बाजूच्या माणगांव, श्रीवर्धन, म्हसळा तालुका वासीयांसाठी काही नवीन नव्हतं. मात्र २६ जुलैच्या निसर्ग प्रकोपापेक्षा महाभयानक परिस्थिती ओढवेल असे कुणाला स्वप्नात देखील वाटले नसेल. पोलादपूर बिरवाडी मधील भुस्खलन नाते किल्ले रायगड रोड वरंडोली कोंझर परिसरात दरड कोसळून ३० कुटुंबे उध्वस्त, संपूर्ण महाडकराणी आयुष्यात पहिला नसेल असा महापूर पाण्याची उंची सुमारे १४ फुटापर्यंत, काही इमारतींचे पाहिले मजले देखील बुडाले, बैठी घरे असणाऱ्यांनी तर कौलारी छता चा आधार घेतला. वयस्कर नागरिकांचे काय झाले असेल तर त्याचा तर आपण विचारच करू शकत नाही. अत्यंत हृदयद्रावक मन हेलवाणारी आपत्ती महाड तालुकावासीयांवर आली. मात्र २३ जुलै अगदी पहाटेपासून जिल्हा प्रशासन जिल्हा पोलिस प्रशासनाकडून मदतीचा ओघ सुरू झाला. प्रामुख्याने यात जीवनावश्यक अतितातडीच्या जिन्नसाचा समावेश करण्यात आला.
रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशपरत्वे माणगांव तालुका प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर व तहसीदार प्रियांका आयरे व जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या उपस्थितीत माणगांव तालुका पुरवठा अधिकारी परमेश्वर खरोडे यांच्या सहकार्याने माणगांव आगारचा २ एस टी बसेस सोबत १ सरकारी कर्मचारी आणि फूड पॅकेट महाड पूरग्रस्त नागरिकांना पाठविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अन्न, वडापाव, पुरीभाजी, उपमा, बिस्कीट पुडे, फरसाण, पाणी बॉटल या अन्नपदार्थांचा सामावेश करण्यात आला होता.
तर मुंबई गोवा हायवेवर माणगांव पोलीस डोळ्यात अंजन घालून मदतीसाठी तत्पर होते पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, माणगांव पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाने रात्रीच महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका बुरुंगले, पो. ह. स्वप्नील कदम, विनायक चांदोरकर, श्रेयस म्हात्रे, रेश्मा वझरकर यांच्या प्रयत्नाने पूरग्रस्त मदत केंद्र निर्माण करण्यात आले व तमाम पूरग्रस्त महाडवासीयांकरिता, बिस्किटे, पाणी बाटली, औषधे व खाद्यपदार्थ यांचे पॅकेट देण्यात आले. जेणेकरून गरजू आपद्ग्रस्त नागरिकांना त्याचा फायदा व्हावा. यामध्ये माणगांव तालुक्यातील बाहुतांशी समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तीनी देखील सहभाग घेतला आहे असे माणगांव पोलीस निरीक्षक खेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


Comments
Post a Comment