'एक्सेल' कंपनी पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन परिसरात सोडतेय केमिकलयुक्त दुषित पाणी

स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका! 

प्रदूषण नियंत्रण मंडळाला फाट्यावर मारून कंपनी 'गंगा' नदीत सोडतेय भयानक प्रदूषण! 

भयानक प्रदूषण!!! 'गंगा' मैली हो गई?

रोहा (प्रतिनिधी) : रोहा तालुक्यातील एक्सेल इंडस्ट्रिज लिमीटेड या कंपनीतून पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन एक्सेल इंडस्ट्रिज लिमीटेड ही कंपनी या परिसरात भयानक प्रदूषण सोडत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.  

विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाला फाट्यावर मारून ही कंपनी प्रदूषण निर्माण करीत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ आस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन या कंपनीतून येथील 'गंगा' नावाच्या नदीत केमिकयुक्त प्रदूषित पाणी सेडले जात आहे. तसेच कंपनीच्या परिसरातील रोठ खुर्द, रोठ बुद्रूक, निवी, वाशी, लाढर, तळाघर, बोरघर या गावांतील नागरिकांच्या शेतीवर देखील या प्रदूषित पाण्याचा गंभीर परिणाम होऊन येथील भातशेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेली आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या कंपनीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष का करतात? असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोरे आणि प्रसाद मोरे यांनी उपस्थित केलेला आहे. 

Popular posts from this blog