राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसची वरसे गणाची आढावा बैठक संपन्न
महिलांनी पुढे येऊन पक्षाचे काम करण्याचे मधुकर पाटील यांचे आवाहन!
रोहा (रविना मालुसरे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टीने महिला व युवतींनी पुढे येऊन पक्षाच्या कार्यात आपला सहभाग नोंदवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांनी केले.
दिनांक १ जुलै २०२१ रोजी वरसे ग्रामपंचायत कार्यालयात रोहा तालुकाध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसची वरसे गणाची आढावा बैठक संपन्न झाली.
खासदार सुनिलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अनिकेत तटकरे पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यात राष्ट्रवादी महिला युवती काँग्रेसची आढावा सभा विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वरसे ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा परिषद गणाची महिला आढावा बैठक जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला अध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सरपंच नरेश पाटील, अमित मोहिते, अरविंद मगर, संजय पाटील, किशोर पाटील, युवती संघटक रविना मालुसरे, महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्या व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Comments
Post a Comment