३ वेळा पाहणी दौरा केला, कामे का पूर्ण झाली नाहीत? खासदार सुनिल तटकरे संतापले!

दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न केल्यास केंद्रीय मंत्री गडकरींसमोर सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना सुनावणार

कोकण रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल!

माणगांव (प्रमोद जाधव) : रायगड रत्नागिरी  लोकसभा ३२ चे खासदार सुनिल तटकरे यांनी दि. २८ जून रोजी माणगांव तहसील कार्यालय येथे माणगांव तालुक्यात होणाऱ्या महामार्ग व कोकण रेल्वेच्या कामांची तसेच विकासकामांची आढावा बैठक घेतली. 

माणगांव शहरातून मुंबई गोवा महामार्ग, दिघी पुणे महामार्ग व कोकण रेल्वेचे काम सुरू आहे. ही कामे चालू असताना अनेक ठिकाणी भरावकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. खा. तटकरे यांनी कोकण रेल्वे मुख्य अभियंत्याला बोलावून कचेरी रोडवरील रेल्वे ट्रॅकवर १ किमी फिरून पाणी जाण्यासाठी नाले बांधा आणि पर्यायी व्यवस्था करा..! असे सक्तीचे आदेश दिले. या आधी दोन वेळा पाहणी करून सुद्धा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही. यावेळी काम नियोजित पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण न केल्यास रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही खा. तटकरे यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना दिला. 

यानंतर खासदार सुनिल तटकरे  यांनी माणगांव प्रशासकीय भवनाच्या सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीस प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे, कोकण रेल्वे व महामार्ग अधिकारी, महावितरण उपअभियंता विजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंद यादव,

माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, दिलीप जाधव गटनेते संदीप खरंगटे व सर्व नगरसेवक, पं. स. सदस्य आदी शासकीय अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई गोवा महामार्गावर जिथे जिथे अपघात होण्याची शक्यता आहे. तिथे लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी. तसेच दिघी पुणे महामार्गावर निजामपूर रोड येथे सुद्धा पाणी साचते.  त्याचेही नियोजन लवकरात लवकर करण्यात यावे. महामार्गावरील तिलोरे फाटा ते कळमजे फाटा यामध्ये सर्व्हिस रोड करण्यात यावा. सुरले बोर्ले येथील भूसंपादनाचा विषयी सुद्धा या बैठकीत चर्चा करण्यात आली व त्यानंतर मुगवली फाटा जावळी हायस्कुल समोर आलेल्या हायवेवरील मातीच्या ढिगाऱ्याचा प्रश्न देखील लवकर लवकरात लवकर मार्गी लावावा अशा सूचना MSRDC च्या  अधिकाऱ्यांना दिल्या.

Popular posts from this blog